Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे यांच्या अधिकारांवर गंडांतर

Share
पंचवटी | वार्ताहर 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी तीन लाखांची लाच घेतल्या प्रकरणात अटक झाली होती. दरम्यान, या प्रकरणानंतर कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यांचे सह्यांचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांनी गोठविले असून याबाबत पणन विभागाने चुंबळे यांना कारणे दाखवा नोटीस काढली असून (दि.६) सप्टेंबरमध्ये कार्यलयात सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असला तरी विरोधी गट सर्व साधारण सभा बोलावून सह्यांचे अधिकार आपल्या गटाकडे घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.
बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी एका संचालकाच्या भाचे जावयाला तात्पुरत्या स्वरूपाची भरतीची मुदत संपल्याने पुन्हा मुदत वाढ करून नियुक्ती पत्र मिळावे यासाठी तीन लाखांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.
या प्रकरणाची पणन मंडळाने गंभीर दखल घेतली असून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम,१९६३ चे कलम ४५(१) नुसार कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी बाजार समितीला एक नोटीस पाठवून सभापती शिवाजी चुंभळे यांचे सह्यांचे अधिकारी दि २६ ऑगस्ट ते दि ६ सप्टेंबर पर्यंत गोठविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच या दरम्यान कुठलेही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेतले गेल्यास त्याला बाजार समिती सचिव हे जबाबदार असणार असल्याचे देखील नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे . सह्यांच्या अधिकाराबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दि ६ सप्टेंबर सुनावणी ठेवण्यात आली असून सुनावणी नंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीला नोटीस मिळाल्यानंतर विरोधी गटाने आपल्या पद्धतीने रणनीती आखायला सुरुवात केली असून लवकरच सर्व साधारण सभेचे आयोजन करून आपल्या गटाला सह्यांचे अधिकार कसे मिळतील याची व्युव्हरचना सुरु करण्यात आली आहे . हा सर्व घटनाक्रम बघता लाच प्रकरण सभापती शिवाजी चुंबळे यांना चांगलेच भोवण्याचे चिन्हे दिसत आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!