शिवाजी चुंबळे व संपत सकाळे यांच्यात ‘फ्री स्टाईल’; अविश्वास दाखल

शिवाजी चुंबळे व संपत सकाळे यांच्यात ‘फ्री स्टाईल’; अविश्वास दाखल

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी चुंभळे व संचालक संपतराव सकाळे यांच्यात अविश्वास ठरावच्या मुद्यावरुन फ्री स्टाईल झाली.

शनिवारी (दि.15) बाजार समितीचे बारा संचालक एकवटले असून त्यांनी सभापती चुंभळे यांच्याविरुध्द अविश्वासाचे जिल्हा उपनिबंधकांना देण्यासाठी गेले असता तेथे हा प्रकार घडला. याबाबत चुंभळेंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे अविश्वासाचे पत्र देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून बाजार समितीतील राजकारण तापले आहे. चुंभळे यांचे स्वाक्षर्‍यांचे अधिकार काढून ते सकाळे यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 12 संचालकांनी एकत्र येत चुंभळे यांच्याविरोधात अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या.

शनिवारी सकाळे हे उपजिल्हानिबंधक बलसाने यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. याबाबत चुंभळे यांना माहिती मिळताच त्यांनी उपनिबंधक कार्यालय गाठले.

या ठिकाणी चुंभळे व सपकाळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वादाचे रुपांतर फ्री स्टाईलमध्ये झाले. ही घटना कळताच मुंबई नाका पोलीस या ठिकाणी दाखल झाले. या घटनेनंतर सकाळे यांच्यासह काही संचालकांनी थेट जिल्हाधिकाऱी कार्यालय गाठले. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना चुंभळे यांच्याविरोधात अविश्वासाचे ठरावाचे पत्र देण्यात आले.

हे संचालक विरोधात

तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, दिलीप थेटे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, संपतराव सकाळे, शामराव गावित, शंकरराव धनवटे, ताराबाई माळेकर, विमलबाई जुंद्रे, रवींद्र भोये व प्रभाकर मुळाणे यांनी अविश्वास पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com