Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जे गेले त्यांचा विचार करू नका; मतदार संघात फिरा विजय आपलाच – शरद पवार

Share

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रवादीचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मात्र, शरद पवार यांच्या स्वागतासाठी तसेच संपूर्ण दौऱ्यात उपस्थित नव्हते त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

मात्र, माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पवार यांचे स्वागत केले. दरम्यान,  जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवक देखील उपस्थित नसल्याने अवघ्या शे सव्वाशे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पवार यांनी बैठक घेतली.

विधानसभा निहाय बैठका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुरु आहेत. यादरम्यात पवार यांनी जे पक्ष सोडून गेले ते गेले जनताजनार्दन आपल्या पाठीशी आहे. कार्यकर्ता, बळीराजा आपल्या सोबत आहेत. आगामी निवडणुकांना जे आपल्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊन पुन्हा एकदा पक्षाची ताकत दाखवून देण्याचा निर्धार पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी दिला.

यावेळी विधानसभानिहाय पदाधिकारी उपस्थित होते.  निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीची उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवा, तेथील समस्या जाणून घ्या असे आदेशही पवार यांनी पदाधिकार्यांना दिले.,

Leave a Comment

error: Content is protected !!