Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन – आव्हाड

Share

पुणे | प्रतिनिधी

भाजपा –शिवसेनेच्या जागावाटपामध्ये शिवसेनेला भाजपने केवळ शंभर जागा देऊ केल्या तरी निमुटपणे घेतील आणि युती करतील असे सांगत त्यांनी तसे केले नाही तर शिवसेना पक्ष फुटेल अशी बोचरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात केली. एका कार्यक्रमानिमित्त आ. जितेंद्र आव्हाड शुक्रवारी पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या घडामोडींसदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आव्हाड यांनी शंभर जागा दिल्या तरी सेना युती करेल, असे भाकीत केले. सेनेने युती नाही केली तर त्यांचा पक्ष फुटेल असेही ते यावेळी म्हणाले. शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत.

शरद पवार राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू आहेत. काल, आज आणि उद्याही शरद पवार हे राजकारणाचा केंद्रबिंदू असतील. वयाच्या ८० व्या वर्षीही ते तरुणाईला भुरळ पडेल अशा पद्धतीने उत्साहाने राज्यभर फिरत आहेत. शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.

शरद पवारांइतके अजित पवार चर्चेत नाहीत असं विचारलं असता, ” शरद पवार आमचे अमिताभ बच्चन आहेत, मात्र आमचा पक्ष म्हणजे काही मल्टिस्टारर सिनेमा नाही” असेही मिश्कील उत्तर त्यांनी दिले.

नरेंद्र मोदी, अमित शहा राज्यात आल्यानंतर शरद पवार यांच्यावरच टिका करतात, असा प्रश्न विचारल्यानंतर आव्हाड म्हणाले, पवार साहेबांचा मी वारकरी आहे, त्यांच्या विचाराची मी पुजा करतो. शरद पवार राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू आहेत. काल, आज आणि उद्याही शरद पवार हे राजकारणाचा केंद्रबिंदू असतील. नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे शरद पवारांवर टीका करत होते, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह टीका करतात. गेली ३५ वर्षे पवार जाग्यावरच आहेत, त्यांच्यावर टिका करणारे खेळाडू बदलले आहेत, असेही आव्हाड म्हणाले.

मोदींचे यांचे नाशिक येथे केलेले भाषण करपलेल्या वरणाला फोडणी दिल्यासारखे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानची साखर चालते, कांदा चालतो, नवाज शरीफला दिलेली अचानक भेट, बिर्याणी सगळं चालतं. फक्त इथे येऊन पाकिस्तानवर टीका करायची. निवडणूक जर महाराष्ट्राची आहे तर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद झालेले एक लाखापेक्षा जास्त कारखाने या सगळ्या विषयांवर मोदी का बोलत नाहीत? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. मोदींचे नाशिक येथील भाषण हे करपलेल्या वर्णाला फोडणी दिल्यासारखे होते अशी टीकाही त्यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!