Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

शरद पवारांची गुगली; बघुयात पुढचे दोन दिवस काय होते ते?

Share
रामनाथ वाघ कृतिशील विचारांनी जगले- शरद पवार, Latest News Sharad Pawar Statement Ramnath Wagh Funeral Ahmednagar

मुंबई | प्रतिनिधी 

दिल्लीत कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी येत्या रविवारपर्यंत राज्यात विविध ठिकाणी दौऱ्यांचे आयोजन केले आहे. आज तातडीची पत्रकार परिषद त्यांनी घेतली.

यामध्ये ते म्हणाले की, भाजप सेनेची गेली २५ वर्षे युती आहे. निवडणुकीला ते सोबतच सामोरे गेले आहेत त्यामुळे सरकार त्यांनी बनवायला हवं. बघुयात पुढचे दोन दिवस काय होतं ते? जर शिवसेना भाजपमध्ये काही झाले नाही तर पवार इतर मार्ग अवलंबून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात फिरत आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी महाराष्ट्राच्या जनतेनं दिली आहे. भाजप शिवसेनेनं तातडीनं सरकार स्थापन करावं, राज्याच्या परिस्थितीवर बोलण्यासारखं नाही, आम्ही जबाबदार विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू असं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

यावेळी ते म्हणाले, राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये. बघुयात पुढचे दोन दिवस काय होते ते? जर काही झाले तर ठीक नाही झाले तर पवार पुढाकार घेण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना सोशल मिडिया उधान आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!