Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक : शब-ए-बारात घरीच साजरी करा – सईद नूरी यांचे आवाहन

नाशिक : शब-ए-बारात घरीच साजरी करा – सईद नूरी यांचे आवाहन

जुने नाशिक | प्रतिनिधी

राज्यातसह देशात करोना व्हायरसमुळे 21 दिवसांचा लॉक डाऊन चालू आहे. महाराष्ट्रात देखील संचारबंदी आदेश लागू असल्याने दिवसातील पाच वेळेची फर्ज नमाज तसेच शुक्रवारची विशेष दुपारची नमाज मुस्लिम बांधव घरीच अदा करत आहेत. तर येत्या 9 एप्रिल रोजी इस्लामी शाबान महिन्याची 15 तारीख आहे, या तारखेला मुस्लिम बांधव ‘शब-ए-बारात’चा सण साजरा करण्यात येतो.

- Advertisement -

या रात्री  सायंकाळी  साधारण सात वाजेपासून रात्रभर मशिदीत एकत्र जमून विशेष प्रार्थना करतात.  त्याचप्रमाणे कब्रस्तान मध्ये जाऊन देखील विशेष प्रार्थना करतात. मात्र, सध्या शासनाने संचार बंदी आदेश लागू केल्याने कोणत्याही स्वरूपाची गर्दी कुठेही करण्यात येणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी म्हणून मुंबई येथून रजा अकादमीचे अध्यक्ष मोहम्मद सईद नुरी यांनी सांगितले.

एका व्हिडिओ संदेशाद्वारे शब-ए-बारातच्या सर्व प्रकारची ईबादत घरीच करावी. कोणीही मशिदी किंवा कब्रस्तान मध्ये जाऊ नये.  संध्याकाळी मगरीच्या नमाज नंतर जी 6 रकात दोन-दोन प्रमाणे नमाज पठण करण्यात येते. त्यासह सर्व प्रकारची इबादत व नमाज घरीच अदा करावी.

9 व 10 एप्रिल रोजी भाविकांनी रोजा ठेवावा. त्याला इस्लाम धर्मात देखील विशेष महत्त्व आहे. मगफिरतसाठी दुवा मागावी. एकमेकांची माफी मागावी. कायद्याचा भंग होणार नाही ही दक्षता प्रत्येकाने घ्यावी, पोलिसांशी व इतर प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांशी कोणत्याही स्वरूपाचा वाद घालू नये, असे आवाहन नुरी यांनी केले आहे.

याबाबत ज्येष्ठ धर्मगुरू मोइन मियाँ अशरफी, मुफ़ती मेहमूद अखतर, ऑल इंडिया  सुन्नी  जमेेेतूूल उलेमाचे सचिव मौलाना मसूद अलीखाँ, आरिफ रजवी यांनी देखील याच प्रकारे आदेश काढल्याची माहिती या व्हिडिओ संदेशामध्ये नूरी यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या