Type to search

लोकसभा २०१९ : फटाक्यांची आतषबाजी; नाशिक जिल्ह्यात सेना-भाजपचा जल्लोष

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लोकसभा २०१९ : फटाक्यांची आतषबाजी; नाशिक जिल्ह्यात सेना-भाजपचा जल्लोष

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आणि सेनेने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. अगदी टपाली मतदानापासूनच हेमंत गोडसे यांनी आघाडी घेतली होती. जवळपास १५ फेऱ्या पूर्ण झाल्या तरी गोडसेंची आघाडी माजी खासदार समीर भुजबळ मोडू शकले नाहीत. दरम्यान, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार हे या लढतीतून बाद झाल्याचे चित्र होते.

दिंडोरीतही मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे जीवा पांडू गावित, आणि भाजपचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार धनराज महाले पिछाडीवर गेले होते. याठिकाणी डॉ. भारती पवार यांनी लाखभर मतांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.

कल युतीच्या उमेदवारांच्या बाजूने येऊ लागल्यानंतर भाजप, सेना कार्यालयांसह मतमोजणी परिसरात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांच्या आवाजात परिसर दुमदुमून निघाला होता.

तर विरोधी  पक्षांच्या कार्यालयात मात्र शुकशुकाट दिसून आला. सकाळपासूनच नाशिक पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ पवार सकाळपासून सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. निवडणुकीचे कल त्यांच्या बाजूने आल्यानंतर त्या दिंडोरी मार्गे नाशिकच्या मतमोजणी परिसरात दाखल झाल्या.

त्या नाशिकला येत असताना वणी, दिंडोरी परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहन थांबवून विजयाकडे वाटचाल करणाऱ्या डॉ. पवार यांचे भव्य स्वागत केले. गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी डॉ पवार यांचे तोंड गोड केले.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!