Type to search

भूसंपादनाची रक्कम अदा न केल्यामुळे सिडको प्रशासकीय कार्यालयाची जप्ती

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भूसंपादनाची रक्कम अदा न केल्यामुळे सिडको प्रशासकीय कार्यालयाची जप्ती

Share
नवीन नाशिक | भूसंपादनाची रक्कम अदा न केल्यामुळे सिडको प्रशासकीय कार्यालयाच्या जप्तीचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार आज प्रत्यक्ष जप्ती कारवाई सुरु झाले आहे.
प्रशासक अनिल झोपे औरंगाबाद येथे असून जागेची रक्कम 3 लाख 55 हजार 611रुपये इतकी असून आजवरच्या व्याजासह ही रक्कम 19,99,351 ₹ इतकी झाली आहे.
ऍड.जयंत जायभावे व अन्य तिघांच्या मालकीची ही जमीन असून मोबदला मिळत नसल्याने त्यानी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने वाहन, पंखे,संगणक, खुर्च्या, कपाटे व सर्व फाईल जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मोबदल्याच्या रकमेचा चेक न मिळाल्यास तात्काळ जप्ती कारवाई करण्याची बेलिफंकडून सूचना देण्यात आली आहे.
Tags:

You Might also Like

1 Comment

  1. cat tree May 3, 2019 4:06 am

    Thanks for finally talking about >भूसंपादनाची
    रक्कम अदा न केल्यामुळे सिडको प्रशासकीय कार्यालयाची
    जप्ती | Deshdoot <Liked it!

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!