Video : नाशिकमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण पाॅझिटिव्ह; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Video : नाशिकमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण पाॅझिटिव्ह; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये दुसरा कोरोना पाॅझिटिव्ह  रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.  याबाबची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, काल (दि ०५.) जे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्यापैकी ३५ तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यातील ३४ अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीवर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी हा संशयित रुग्ण कठडा येथील जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाला होता. दिल्लीमधून राज्यात आलेल्या प्रवाशांमधील हा एक असल्याचे समजते.

या व्यक्तीवर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात कोण-कोण आले आहेत याबाबची माहिती मिळविणे सुरूं आहे.

ज्या नागरिकांनी दिल्ली परिसरातून प्रवास केला असेल अशांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावयाची आहे असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

नाशिकमध्ये आतापर्यंत २३४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यातील २१९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर १३ अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.

आतापर्यंत एकूण २१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्याच्या परिस्थितीत १६ रुग्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणी रुग्णालयात दाखल  आहेत. यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात ०७, डॉ. झाकीर हेसे रुग्णालयात ०८ तर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात ०१ रुग्ण दाखल आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com