Type to search

Breaking News Diwali Articles Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Share

नाशिक | गुंजन दुसानिस 

गणपती विसर्जन होताच वेध लागतात ते नवरात्री उत्सवाचे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोउत्सवाकरीता देवींच्या मूर्ती बनविण्याचे काम कारागिरांनी सुरु केले आहे. शहरातील वेगवेगळ्या परिसरात मूर्ती बनविण्यात येत असून देवीचे विविध रूपं कारागीरांच्या हातांनी साकारल्या जात आहेत.

नाशिक शहरातील द्वारका, एमजी रोड, नवीन नाशिक तसेच पंचवटी परिसरात देवीच्या मूर्ती बनवून तिथेच रंगरंगोटी केली जात आहे. नवरात्रासाठी स्थानिक कारागिरांसह परराज्यातून आलेल्या कारागिरांकडूनही मूर्ती तयार करून रोजगार मिळवला जात आहे.

नाशिकच्या द्वारका परिसरात सध्या विविध कलाकारांनी आपले छोटेखानी मूर्ती तयार करण्याचे कारखाने उभारले आहेत. या कारखान्यात सध्या अहोरात्र मूर्तीला अंतिम रूप देण्यात कारागीर व्यस्त दिसत आहेत. नवरात्रोउत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे मूर्तीवर गडद रंग लावण्याकरता कारागिरांकडून आपले कौशल्य पणाला लावले जात आहे.

यंदा २०० पासून ते १० हजार रुपयांपर्यंत मूर्तीचे दर आहेत. शहरात अनेक ठिकाणी मूर्तीला आकार देण्याचे काम कारागीर करीत आहेत. यात दुर्गा मूर्ती, सप्तश्रृंगी, सिंहारुढ विंध्यवासिनी, अष्टभुजा, महिषासुर मर्दिनी, तुळजा भवानी, कालिका, रेणुका माता अशा विविध रूपातील देवीच्या मूर्ती आकाराला येतांना दिसून येत आहे. तसेच लहान मोठ्या आकर्षक मुर्त्या बाजारपेठेत विक्रीसाठी आताच दाखल झालेल्या दिसून येत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!