Type to search

Featured नाशिक

सावकीच्या उपसरपंचपदी अरुण शिवले बिनविरोध

Share

लोहोणेर | वार्ताहर

विकास कामाच्या दृष्टीने प्रगतीपथावर असलेल्या देवळा तालुक्यातील सावकी येथील प्रगतीशील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण सखाराम  शिवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सावकी ग्रामपंचायतीच्या विधमान उपसरपंच मनीषा शंकर सोनवणे यांनी आवर्तन पद्धती नुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विद्यमान सरपंच उषाबाई दगडू सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यची बैठक बोलविण्यात आली होती.

यावेळी उपसरपंच पदासाठी अरुण शिवले यांचे एकमेव नाव पुढे आल्याने उपसरपंचपदी अरुण शिवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीस सरपंच सौ.उषाबाई दगडू सोनवणे, सदस्य कारभारी पवार, अरुण शिवले, राजाराम गोधडे, अक्काबाई गायकवाड, अहिल्याबाई पवार, संजय गांगुर्डे, भिका वाघ, सुवर्णा पाटील, मनीषा सोनवणे, धर्मा शिवले, सुरेश पाटील, प्रतापराव पाटील, पोपट तिवारी, गणेश तिवारी, भिका गायकवाड, बाबुराव जाधव, भरत बोरसे, अंबादास बोरसे, आयुष पटेल, जीभाऊ निकम, भिकन भामरे, निलेश पाटील, शाहिद शेख, दिलीप पाटील, केवळ भामरे, पुंडलिक शिवले, पोलीस पाटील आश्विनी बच्छाव, नामदेव शिंदे, अनिल भामरे, सर्व सोसायटी सदस्य, ग्रामसेवक कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!