Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘नीट’मध्ये नाशिकचा सार्थक भट देशात सहावा तर महाराष्ट्रात प्रथम

Share

नाशिक । प्रतिनिधी

एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय विद्या शाखांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’(नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट)परीक्षेत नाशिकच्या सार्थक भट याने 695 गुण मिळवत देशात सहावा तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. राजस्थानच्या नलिन खंडेलवाल 720 पैकी 701 गुण मिळवत देशात अव्वल क्रमांक पटकावला.

मे महिन्यामध्ये राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे ही परीक्षा घेण्यात आली. नीट 2019 परीक्षेचा निकाल आज (दि.5) जाहीर करण्यात आला. परीक्षेसाठी देशभरातून 15 लाख 19 हजार 375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 7 लाख 97 हजार 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राजस्थानच्या नलिन खंडेलवालने देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. दिल्लीच्या भाविक बन्सलने दुसरा, तर उत्तर प्रदेशच्या अक्षत कौशिकने तिसरा क्रमांक पटकावला. नाशिकच्या सार्थक भट याने 720 पैकी 695 गुणांची कमाई करत देशात सहावा येण्याचा मान मिळवला. मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने राष्ट्रीय स्तरावर सातवा क्रमांक पटकावला.

.
नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थी

सार्थक भट याने क्रांतीवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. बारावी विज्ञान शाखेतून 91 टक्के गुण मिळवून त्याने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. सार्थकचे वडील राघवेंद्र भट, आई चित्रिका भट हे दोघेही डॉक्टर असल्याने सार्थकला देखील याच क्षेत्रातील करियरची आवड आहे.

सार्थक भट यास नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शांताराम बडगुजर,उपप्राचार्य कैलास गीते,सायन्स विभागाचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सार्थक भट याचे संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड,सरचिटणीस हेमंत धात्रक,सरचिटणीस तानाजी जायभावे यांनी कौतुक केले.

हार्ट सर्जन होण्याचे स्वप्न

दररोज 12 ते 16 तास अभ्यास करून नीट परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो.मेडिकलचे शिक्षण घेऊन हार्ट सर्जन होण्याचे स्वप्न आहे.बारावी तसेच नीट परीक्षेची तयारी करताना सेल्फ स्टडीवर विशेष लक्ष दिले.

-सार्थक भट, विद्यार्थी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!