Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सपकाळमध्ये महिना लोटला तरी होत नाहीत तासिका; संस्थेची शिष्यवृत्ती थेट सहकारी बँकेच्या खात्यात वर्ग?

Share

नाशिक | प्रतिनिधी 

सपकाळ नॉलेज हब या शैक्षणिक संस्थेतील साडेचार हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. महाविद्यालय सुरु होऊनही पगार होत नसल्याने अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत तोडगा काढावा अशी मागणी विद्यार्थी सदस्य आणि पालकांकडून करण्यात आली आहे.

संस्थेत साडेचार हजार विद्यार्थी विविध शाखेत शिक्षण घेत आहेत. अजून नियमित तासिका सुरूच होत नसल्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगारच झाले नसून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संस्थेला मिळणारी शिष्यवृत्ती शहरातील एका सहकारी बँकेच्या खात्यात वर्ग होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याचेही या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जर या महाविद्यालयाचा प्रश्न सुटत नसेल तर विद्यार्थ्यांना कॅटेगिरीनुसार इतर संस्थेत प्रवेश देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली  जाईल. याबाबत संस्थाचालक यांना पाचारण करून त्यांना समज दिली जाईल,असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळास दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!