Type to search

Video : समृध्दीमुळे दुष्काळात तेरावा; जेसीबीने जलवाहिनी फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : समृध्दीमुळे दुष्काळात तेरावा; जेसीबीने जलवाहिनी फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया

Share

डुबेरे । वार्ताहर

संपूर्ण गाव सध्या दुष्काळाचा दाह सोसत आहे. शासकीय यंत्रणेच्या टँकरसह सामाजिक संस्थाकडून उपलब्ध होत असलेल्या टँकरच्या फेर्यांवरच गावकर्यांची तहान भागवली जात असून सार्वजनिक विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन समृध्दीचे काम करणार्या जेसीबीने दोन दिवसांपूर्वी दुसर्यांदा फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

त्यामुळे गावासाठी दुष्काळात तेरावा ठरला आहे. फोडलेली पाईप लाईन दुरुस्त करुन द्यायला कंपनीच्या प्रशासनाने कानावर हात ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.गाव व परिसरावर दुष्काळाचे सावट असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह रहिवाशांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.

सार्वजनिक विहिर कोरडी ठाक पडली असल्याने शासकीय यंत्रणेकडून मिळणार्या टँकरच्या फेर्यांवरच गावाची तहान भागविण्याचे काम ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे.

गावाची लोकसंख्या लक्षात घेता शासनाचे मिळणारे पाणी गावकर्यांची तहान भागविण्यास अपूरे पडते. त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काही सामाजिक संस्था, उद्योजक यांच्या पुढाकारातून गावासाठी टँकरच्या फेर्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.

तर काही कारखान्यांकडून पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळ निधी पुरविण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था, मुंबई येथील जाणता राजा प्रतिष्ठाण, एव्हरेस्ट कंपनी, टाटा तारचे डिस्ट्रीब्युटर समीद माहेश्वरी यांच्यासह सुशील पटेल, अमोल ट्रेडर्सचे संचालक अरुण वारुंगसे यांच्यासारखे दातृत्वान लोक गावकर्यांची तहान भागविण्यासाठी पुढे आले आहे.

त्यांच्याकडून उपलब्ध होत असलेले पाणी सार्वजनिक विहिरीत टाकून त्यातून पाईपलाईनद्वारे गावातील पाणीपुरवठ्याची टाकी भरुन घेतली जाते. तेव्हा गावात दिवसाआड पाणी पुरवठा होतो.डुबेरे हद्दीत समृध्दी महामार्गाचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडून वेगात सुरु आहे.

या रस्त्याच्या कामाच्या हद्दीतून गावाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन गेलेली आहे. तीन दिवसांपूर्वी रस्त्याचे काम करत असलेल्या जेसीबीने 6 इंची पाणीपुरवठ्याची पाईप लाईन फोडली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले समृध्दीचे काम करणार्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गावकर्यांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ग्रामपंचायतच्या कर्मचार्यांनी शर्तीचे प्रयत्न करुन पाणी गळती थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी टाळटाळ करण्यात येत असल्याचा आरोप सरपंच सविता वारुंगसे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी केला आहे.

व्यवस्थापनचा बेजबाबदारपणाकाम करत असताना पाईपलाईन फुटणे साहजिक आहे. मात्र, ग्रामपंचायत कर्मचार्यांना विचारुन काम केले तर नुकसान टळू शकते. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन रस्त्याचे काम सुरु असताना फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. सामाजिक संस्था, व्यक्तींच्या मदतीने गावकर्यांची तहान भागविली जाते.

दुष्काळी परिस्थितीत पाण्याच्या थेंबालाही मोठी किंमत आहे. अशावेळी हजारो लिटर पाणी वाया गेल्याने गावकर्यांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. सामाजिक बांधिलकीतून फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करुन देणे व्यवस्थापनाचे कर्तव्य होते. मात्र, तसे न करता यापुढील काळात पाईपलाईन फुटली तर जबाबदारी आमची राहणार नसल्याचे व्यवस्थापनाकडून सांगितले जाते ही बाब संतापजनक असल्याचे सरपंच सविता वारुंगसे म्हणाल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!