Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक ग्रामीण पोलीसही रात्रीच्या वेळी अडचणीत असलेल्या महिलांना घरी पोहोचविणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

हैद्राबाद व उत्तर प्रदेश महिला अत्याचार घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पाठोपाठ नाशिक ग्रामिण पोलीस दलाने रात्री अडचणीत असणार्‍या महिलांना सुरक्षेच्या कारणास्तव घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी गस्त पथकांचा उपयोग करण्यात येणार आहे. ग्रामीण भागाचा आधुनिकतेमुळे चेहरामोहरा बदलला असून, वेगवेगळ्या जबाबदारींमुळे महिलांना घराबाहेर पडावे लागते. अशावेळी एकट्या महिलेला रात्री अपरात्री एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचणे सुलभ व्हावे यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग यांनी ही योजना पुढे आणली आहे.

नाशिक जिल्ह्यात शाळा, कॉलेजेस, विविध महत्त्वाचे कार्यालये, औद्योगिक क्षेत्र असून, नोकरी व इतर जबाबदारीमुळे महिला, युवतींना घराबाहेर पडावे लागते. सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध असली तरी रात्री अपरात्री महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर गस्तीवरील पोलिस यंत्रणेचा योग्य तो वापर या निमित्ताने करण्यात येणार आहे.

आपत्तकालीन सेवांसाठी पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असतो. 24 तास ही सेवा उपलब्ध असून, देखरेख व नियंत्रणाची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षकांकडे दिलेली असते. रात्रीच्या वेळी जिल्हा रात्र गस्त मोबाईल, विभागीय रात्र गस्त मोबाईल, दरोडा गस्त मोबाईल, स्थानिक गस्त मोबईल तसेच चेतक मोबाईल आपले कर्तव्य बजावत असतात.

रात्रीच्यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर संकटात सापडण्याची शक्यता असलेल्या महिलांना सुरक्षितता प्रदान करण्याचे काम या गस्त पथकांमुळे होते. रात्रीच्या वेळी काही कारणास्तव प्रवासाची वेळ आल्यास महिला लागलीच या पथकांची मदत घेऊ शकतात. यासाठी महिलांनी नियंत्रण कक्षाशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी केले आहे.


महिलांसांठी संपर्क क्रमांक

नियंत्रण कक्ष- 100
महिला हेल्पलाईन- 1091, 2200491
जेष्ठ नागरिक- 1090
नियंत्रण कक्ष – 0253-2309718, 2303044, 2200495
व्हॉट्सअ‍ॅप तक्रारीसाठी- 8552963251
मालेगाव नियंत्रण कक्ष- 02554-231000 आणि 231551

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!