Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आज एकता दौडचे आयोजन

Share

नाशिक | प्रतिनिधी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या (दि.31) देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून या निमित्त सर्व जिल्हा मुख्यालये, महत्त्वाची शहरे आदी विविध ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ’रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्तर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

यानिमित्ताने आयोजित दौडद्वारे एकतेचा संदेश देण्यात येणार आहे. या दौडमध्ये क्रीडा संघटना, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा पाचही जिल्ह्यात राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथून सकाळी 7 वाजता एकतेची शपथ घेऊन या दौडचा शुभारंभ होईल. जिल्हाधिकारी सूरज मांढरे एकतेची शपथ देतील. एमजीरोड, रेडक्रॉस सिग्नल, सीबीएसमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे दौडचा समारोप होणार आहे. एकता दिवसाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तालुका व जिल्हा स्तरावरून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!