Friday, April 26, 2024
Homeनाशिकआरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता; या आहेत अटी

आरटीई प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता; या आहेत अटी

3 किमी पेक्षा अधिक अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार लाभ

नाशिक । प्रतिनिधी 
राज्यातील आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे. शाळेपासून 3 किमीपेक्षा अधिक अंतरावर वास्तव्य असणाऱ्या वस्तीवरील बालकांना हा लाभ दिला जाणार असून नाशिक जिल्हयात बागलाण, चांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व देवळा या तालुक्यातील सुमारे 119  विद्यार्थी यासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा 2009 व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क नियम 2011  मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, हि सुविधा देताना आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांचे शाळेत ये-जा करण्याचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार लहान वस्तीवरील बालकांना शाळेत प्राथमिक शिक्षण देण्यासाठी तीन ते पाच किमी अंतरासाठी वाहतूक सुविधा देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. माहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या अधिसूचनेनुसार राज्यात आरटीई अंतर्गत 917 वसतिस्थाने निश्चित करण्यात आली आहेत.
तेथील 4875  विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. नाशिक जिल्हयात आरटीई प्रवेशित बालकांपैकी 119  बालकांना प्रवासभत्ता देण्यात येणार असून त्यात बागलाण (59), चांदवड (18), दिंडोरी (32), त्र्यंबकेश्वर (07) व देवळा (04) या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या