Type to search

Breaking News नाशिक

जातीयवादी वक्तव्य केल्याबद्दल बीडच्या उपाधिक्षकांच्या निलंबनासाठी मोर्चा

Share

मनमाड(प्रतिनिधी): बीडच्या पोलीस उपाधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी दलित-मुस्लिमां बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज मनमाड शहरात उमटले.

आरपीआयच्या नेतृत्वाखाली शिवसेना,कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,भारिप बहुजन महासंघ,फुले-शाहू मुस्लीम विचार मंच,वंजारी सेवा संघ,जेष्ठ नागरिक संघ,भारतीय बौद्ध महासभा यासह विविध राजकीय पक्ष,दलित व सामाजिक संघटनानी काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढला यावेळी मंडल अधिकारी कैलाश चौधरी यांना निवेदन दिले.

त्यात नवटक्के यांना निलंबित करून त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक व हिंदू-मुस्लीम मध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल एचएम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

रिपाईचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे,नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन,कैलाश आहिरे,दिनकर धीवर,अनिल निरभवणे यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय भवना पासून मोर्चा काढण्यात आला.अटक करा,अटक करा भाग्यश्री नवटक्के यांना अटक करा,जातीयवादी या पोलीस अधिकाऱ्याचा धिक्कार असो आदी घोषणाबाजी करत हा मोर्चा शहरातील विविध मार्गावरून जावून एकात्मता चौकात आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.

या प्रसंगी विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी भाग्यश्री नवटक्के यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्याचा जळीत जळीत निषेध केला.पोलीस हवालदारा पासून वरिष्ठ अधिकाऱ्या पर्यंत यांच्यासाठी सर्व जाती धर्मांचे नागरिक एक सामान असतात मात्र भाग्यश्री नवटक्के सारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याची जान न ठेवता दलित व मुस्लिमां बाबत केलेले वक्तव्य पाहता ही अधिकारी जातीयवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर महिला पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत राहिल्यास दलित-मुस्लिमच नव्हे इतर इतर जाती धर्मांच्या नागरिकांना न्याय टर मिळणारच नाही उलट त्यांच्यावर अन्याय होण्याचीच दाट शक्यता आहे त्यामुळे अशा जातीयवादी अधिकाऱ्याला पोलीस विभागात ठेवणे सर्व समाजा साठी धोक्याची घंटा असून अनेक निरपराध नागरिक या अधिकाऱ्याच्या जातीवादी प्रवृतीला बळी पडतील.

त्यामुळे भाग्यश्री नवटक्के यांना तातडीने निलंबित करून तिच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती (अट्रोसिटी)व एच एम दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पी.आर.निळे,नगरसेवक रवींद्र घोडेस्वार,बब्बू कुरेशी,शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,फिरोज शेख रुख्मिनी आहिरे,गुरू निकाळे,राजेंद्र जाधव,संजय कटारे,सुरेश आहिरे,श्रीकृष्ण पगारे,विलास आहिरे,मिरझा अहमद बेग,नरेंद्र कांबळे,सुरेश जगताप,अन्वर शेख ,अकिल शेख,जनार्दन वाघ,पप्पू दराडे,पंडित सानप,दिनेश घुगे,पप्पू दराडे,एकनाथ बोडखे,सचिन दरगुडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!