Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo/Video : गुलशनाबादची अनुभूती; उद्यापासून नासिक्लबला भव्य पुष्पप्रदर्शन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

एकेकाळी गुलशनाबाद ओळख असलेल्या नाशिकमध्ये यावर्षीची भव्य पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि. २४) ते रविवार (दि. २६) जानेवारीपर्यंत या पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्पप्रदर्शनात यंदा तब्बल ८५० प्रकारचे गुलाबपुष्प आणि इतर दुर्मिळ पुष्पांची रोपटी याठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती रामेश्वर सारडा यांनी आज दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नासिक्लब पुष्पप्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.  पहिल्यांदाच गुलाब पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात याठिकाणी करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या गुलाबाच्या फुलांचे आकर्षक प्रदर्शन याठिकाणी नाशिककरांना बघावयास मिळणार आहेत.

डेहरादून, खरगपूर येथून आणलेल्या गुलाब पुष्पासोबतच, शेवंती, कॅलेनड्युला, ब्राझीलीयन बटरफ्लाय, सेलोसिया, इम्पेशन, सल्विया, अडेनियम, डेलिया, बेगोनिया, जिरेनियम, डायनथस, ओरनामेंटल केल, पेटुनिया आदी फुलझाडांचे प्रकार या पुष्पप्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

पुष्पप्रेमी तसेच नाशिकच्या रसिकांनी प्रदर्शनास भेट देऊन फुलांच्या अनोख्या जाती बघण्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले करण्यात येणार आहेत.

यंदाच्या पुष्पप्रदर्शनामध्ये पुष्पप्रेमी नाशिककरांना सामावून घेण्याचा मानस आयोजकांचा आहे. यासाठी औपचारिक नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्या नाशिककरांचे पुष्पदेखील या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. आतापर्यंत १५ नाशिककरांनी यात नोंदणी केली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

हे आहे खास

  • पुष्प प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष
  • ८५० गुलाब पुष्प
  • १२०० एकट्या गुलाबपुष्पाच्या कुंड्या
  • देहराडून, खरगपूर येथून आणल्या दुर्मिळ प्रजाती
  • हंगामी फुलांच्या जवळपास १५ पेक्षा अधिक प्रजाती
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!