Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये आता रोबोट करणार ऍन्जिओप्लास्टी; ‘मॅग्नम हार्ट’मध्ये देशातील दुसरे रोबोटीक तंत्रज्ञान

Share

नाशिक । प्रतिनिधी

ह्रदयरोगामध्ये महत्वाची असलेली अँन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने करण्याचे तंत्रज्ञान नाशिकमध्ये उपलब्ध झाले आहे. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्युटमध्ये अशा प्रकारचे रोबिटीक तंत्रज्ञान रुग्णांना वरदान ठरणार असून रोबटिक तंत्रज्ञानातून रुग्ण उपचार देणारे हे देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, अशी माहीती प्रसिध्द हृदयरोग तज्ञ मॅग्नम हॉर्ट इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. मनोज चोपडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. चोपडा म्हणाले, गेल्या दहा वर्षापासून मॅग्नम इन्स्टिट्यूटमध्ये हृदयरोगाच्या रूग्णावर यशस्वी उपचार केले जात आहेत. आम्ही नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञान नाशिक मधील रूग्णांसाठी उपलब्ध करून देत आले आहोत.

त्यामध्ये आयव्हीयूएसए, एफएफआर आणि 4डी इको आदी अत्याधुनिक तत्रज्ञानाचा समावेश आहे. आता रूग्णसेवेसाठी ‘मॅग्नम’ने अत्याधुनिक पाऊल उचलले आहे.

एफ.डी.ए. प्रमाणिक अँन्जिओप्लास्टीसाठी रोबोटएफ.डी.ए. प्रमाणिक अँन्जिओप्लास्टी रोबोट हे प्रगत तंत्रज्ञानात ‘मॅग्नम’ मध्ये उपलब्ध झाल्याने विश्वातील अतीप्रगत पहिल्या दहा रूग्णालयांच्या यादीत ‘मॅग्नम हार्ट’ने स्थान मिळवले आहे.

हा रोबोट कोरिंडस नामक विदेशी कंपनीचा असून जगातील दहावा, इस्ट आशिया व युरोप खंडातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिला रोबोट ठरला आहे. अशी शस्त्रक्रिया रोबट द्वारे होत असली तरी तिचे कार्यन्वयन, नियमन मानवी हाताद्वारेच होत असल्याने डॉ. चोपडा यांनी रोबोट चालविण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण जर्मनीमध्ये जाऊन घेतले.

ज्या शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट व कठीण असतात अशा शस्त्रक्रिया रोबोट च्या सहाय्याने केल्यास त्यांचा यशस्वी होण्याचा दर हा 100टक्के इतका वाढतो. याद्वारे ‘मॅग्नम’मध्ये आजवर जवळपास 50 शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या. देशातील मोठ्या महानगरात हे तंत्रज्ञान अद्याप उपलब्ध का झाले नाही या प्रश्नावर डॉ चोपडा म्हणाले,

वैद्यकीय क्षेत्रात जेव्हा अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातली जाते तेव्हा त्यातून येणारे परिणाम हे रूग्ण उपचारासाठी नेहमीच मोलाचे ठरतात. रोबोटीक यंत्रणाला ही भविष्यात फार महत्वाची ठरणार असून तिचा फायदा सर्वसामान्य जनतेस होईल असेही डॉ. चोपडा यांनी नमूद केले.

‘रोबोट’ चे फायदे

  • कठीण केसेस मध्ये अचूक निदान करणे सोपे
  • जलद प्रक्रिया त्यामुळे किरणोत्सराचे प्रमाण कमी
  • रोबोट द्वारे 1 एम.एम. पर्यंतची अचूक स्थिती साध्य करता येते. त्यामुळे स्टेन्ट अचूक जागी बसविता येतो.
  • पॉईंट आणि शूट अचूक केले जाते
  • रोबोटिक प्रणाली पद्धतीमुळे ऑपरेशन अचुक आणि जलद विनाअडथळा करता येणे शक्य
  • ऑपरेशन अत्यंत अचूक होण्यास मदत.
  • रोबोटिक प्रणालीत अधिकाधिक संसाधनाचा वापर होत असल्यामुळे पूर्वी ऑपरेशनसाठी होणार्‍या खर्चापेक्षा फक्त थोडासा अधिक पण त्यामध्ये फार मोठा फरक पडणार नाही.

विश्वविक्रम

डॉ. मनोज चोपडा यांनी रोबोट वापरून जागतिक विक्रम सुध्दा नोंदविला आहे. ज्यात एका रुग्णात सुरवातीपासून अखेरपर्यंत बंद पडलेली रक्तवाहिनी रोबोटद्वारे मोकळीकरुन त्यामध्ये 60 एम.एम. लांबीचा ‘स्टेन्ट’ यशस्वीरित्या बसविण्यात आला. रोबोटद्वारे इतका मोठा स्टेन्ट बसविण्याचे ही शस्त्रक्रिया जगात प्रथम यशस्वी करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!