Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मोदींच्या सभेत चोरट्यांचा डल्ला; दोन दुचाकी, १० ते १५ मोबाईल चोरीला

Share

पंचवटी | प्रतिनिधी

महाजानादेश यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप पार पडला. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांचे मोबाईल आणि दोन महागड्या दुचाकी तपोवन परिसरातून चोरून नेल्याची घटना घडली. कार्यकर्त्यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठल्यानंतर या घटना उघडकीस आल्या.

अधिक माहिती अशी की, राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आज हजारो कार्यकर्ते आज महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

पार्किंगव्यवस्था मुख्य सभामंडपापासून दूरवर केलेली होती. जवळपास एक किमी अंतरावर पायपीट कार्यकर्त्यांना करावी लागली. व्हीआयपी कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील पायी जाताना दिसून आले होते.

दरम्यान, वाढलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेत कार्यकर्त्यांचे १० ते १५ मोबाईल लंपास केले. तर दोन दुचाकीही चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीत एक दुचाकी साधूग्राम येथील सभास्थळापासून तर दुसरी औरंगाबाद रोडपरिसरातून चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी कुठलीही तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही मात्र, चोरीच्या घटना घडल्याच्या वृत्ताला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दुचाकीचे कागदपत्रे, मोबाईलचे बिल आणल्यानंतर तक्रारी दाखल केल्या जातील असे सांगण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!