Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये कोसळधार; शहरातील रस्ते पाण्याखाली

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरु आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा हंगामातील सर्वात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे.

गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली असतानाच आता शहरातील विविध रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील कॉलेजरोड, महात्मानगर, पंचवटी, रविवार कारंजा, अशोक स्तंभ परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

रविवार असल्यामुळे सकाळी अनेक नाशिककरांनी नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सोमेश्वर धबधबा परिसर, अहिल्यादेवी होळकर पूल, गाडगे महाराज पूल इथे उभे राहून अनेक नाशिककरांनी गोदामाईचा पूर आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!