Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

एक दिवस बाप्पासाठी; रिक्षावाल्या काकांची दिवसभर ‘मोफत सेवा’

Share

नाशिक | प्रतिनिधी 

प्रत्येकालाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. केव्हा गणरायांचे आगमन होईल असे चित्र सर्वत्र सुरु आहे.  शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टाॅल लागले आहेत. गणरायाची साधना करण्यासाठी कोण कशाप्रकारे सेवा करेल हे सांगता येत नाही. नाशिकच्या प्रकाश चव्हाण हे त्यातीलच एक आहेत. संसाराचा गाडा हाकताना आयुष्यभर रिक्शाने साथ दिली. आज जे काही मिळवले ते रिक्ष्यामुळेच; त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये त्यांनी नाशिककरांच्या घराघरांत रिक्षाने मोफत बाप्पा पोहोचविण्याचे ठरवले आहे. ठक्कर बाजार येथून चव्हाण आपला मित्र साहेबराव राठोड या मित्रासोबत गणेश चर्तुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायांना घरापर्यंत पोहोचविणार आहेत.

रिक्षावर एक फलक लिहून त्यांनी रिक्षाचालकांच्या समोर एक आदर्श उभा करून दिला आहे. इतर शहरांमध्ये हा उपक्रम राबविला जातो तर आपल्या नाशकात का राबवू नये ? असा त्यांना प्रश्न पडला. त्यानंतर या उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वत:पासून करण्यास सुरुवात केली.  चव्हाण यांनी दोन वर्षापूर्वीच हा उपक्रम हाती घेतला होता. दोन वर्षे कुणी सोबत मिळाले नाही, मात्र यंदा त्यांचा एक रिक्शामित्र त्यांच्यासोबत आहे.

चव्हाण मुळचे जळगाव जिल्यातील करगाव येथील आहेत. रोजगाराच्या निमित्ताने ते नाशिकला आले. गेल्या २३ वर्षांपासून ते रिक्शा चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलग पुण्यात नामांकित महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. मुलीलाही दहावीत ९० टक्के गुण मिळाले आहेत. तीही उच्चशिक्षण नाशकात घेत आहे. अंगातल्या कपड्यांवर आलेलो असताना रिक्शामुळे मला सर्वकाही मिळाले; जगण्याची नवी दिशा मला रिक्शानेचे दिली असल्याचे चव्हाण म्हणतात.

समाजाचे कुठेतरी देणं लागतो यामुळे रिक्शातूनच काहीतरी समाजसेवा व्हावी म्हणून आपण हा मार्ग अवलंबला असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण शहरातील नवश्या गणपतीला आपला गुरु मानतात. पैसा अनेकजण कमवतात पण आत्मिक आनंद पैसा मोजल्यावर मिळत नाही. त्यासाठी माणसं जोडावी लागतात, आज मुलं मोठी झाली आहेत, आपलं कर्तव्य आपण केलं यापेक्षा मोठी गोष्ट काही असू शकत नाही असे ते म्हणतात.

येत्या २ सप्टेंबरला प्रकाश चव्हाण हे नाशिकमधील ठक्कर बाजार येथील रिक्शा थांब्यावर मोफत सेवा देण्यास सज्ज राहणार आहेत. त्यांच्या रिक्शाचा क्रमांक एमएच १५, झेड ६९१५ असा आहे. त्यांच्या सोबत साहेबराव राठोड हेदेखील असतील त्यांच्या रिक्शाचा क्रमांक एमएच १५ झेड एच ०६५१ असा आहे. ते शहरातील ठक्कर डोम, म्बिबी सर्कल, महात्मा नगर, पारिजात नगर, कॉलेज रोड, येवलेकर मळा, कॅनडा करणार इत्यादी भागात उभी राहणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!