Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : विद्युत खांबात वीजप्रवाह उतरला; रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू

Share

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

अंबड नजीक असलेल्या महालक्ष्मीनगर परिसरात विद्युत पोलमधील विजेचा प्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरल्याने यात एका रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आज दुपारपासून शहर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास अंबड येथील महालक्ष्मीनगर येथे वडाळा गाव परिसरात राहणारे रिक्षाचालक दानीश आयमान शेख ( 27 वर्षे ) हे आपली रिक्षा ( एम एच 15 – ई एच 2013 ) प्रवासी भाडे घेऊन महालक्ष्मीनगर येथे आले होते.

दरम्यान, परिसरातील रस्त्याच्या बाजुला असलेल्या विद्युत डीपी पोलमध्ये पाणी जाऊन वीज प्रवाह थेट पाण्यात उतरला. या दरम्यान या रस्त्यावरून रिक्षा सुरू होत नसल्याने दानीश यांनी रिक्षा ढकलत पुढे नेले.

या ठिकाणाहून जात असताना विद्युत प्रवाह पाण्यात उतरला असल्याने त्या प्रवाहाचा त्यांना झटका बसला. हा प्रवाह इतका जोरदार होता की दानीश यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडीत केल्याने इतर मोठा अनर्थ टळला. मात्र, यात दानीश यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी नवीन नाशिक प्रभाग सभापती दीपक दातीर यांनी पाहणी करत वीज मंडळ व महापालिका प्रशासन यांच्या बेजबाबदारपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकाराला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!