Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अतिदुर्गम चिंचलेखैरे जि. प. शाळेच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन; युनायटेड इंडिया इन्शुरन्स करणार अर्थसहाय्य

Share

इगतपुरी । वार्ताहर

अतिदुर्गम भागात असलेल्या चिंचलेखैरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नूतन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. आदिवासी अतिदुर्गम अशा विद्यार्थाची वाढती संख्या पहाता जि. प. प्राथमिक वर्गांची कमतरता असल्याने व अतिवृष्टीमुळे जुनी  इमारत गळत असल्याने मुलांना बसण्याची सुविधा नव्हती. यामुळे ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत निधीतुन शाळेची भव्य इमारत बांधून मिळणार आहे.

या कामाचे कंपनीचे जनरल मॅनेजर वाय. के. शिमरे तसेच श्रीमती शिमरे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात आदिवासी नृत्य, कामडा नृत्य, बालगीते आदी सादर केली. मुलांचे कलागुण पाहून मान्यवर अक्षरशः भारावून गेले त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

ग्रामिण भागातील विद्यार्थाची शिक्षणाची जिद्द व चिकाटी पाहाता या भागातील विद्यार्थानी विविध कला कौशल्य अंगीकृत केले आहे. हे विद्यार्थी देशाचे भविष्य असुन शहरी भागातील डिजिटल शाळे प्रमाणे या विद्यार्थानां सुद्धा शिक्षण पद्धती मिळाली तर विद्यार्था बरोबर गावाचा व सामाजिक विकास होण्यास मदत होईल असे प्रतिपादन यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर वाय. के. शिमरे यांनी या कार्यक्रम प्रसंगी केले.

अशी उदात्त भावना ठेवुन मदतीचे हात यावेळी सरसावल्याचे पाहुन ग्रामस्थांनी सुद्धा परिश्रम घेत विद्यार्थी चांगले घडवुन देशाभिमान वाढवु अशी ग्वाही दिली. यावेळी शालेय व्यवस्थापनेच्या वतीने व मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून आभार मानले.

या प्रसंगी चेन्नई येथील युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर वाय. के. शिमरे, वि. आर. कृष्ण, डेप्युटी जनरल मॅनेजर बी.एस ढिल्लन, श्रीकांत वाणी, मंगेश मिलखे, डॉक्टर प्रशांत मोरे, अनिल नरोलिया, ज्योतिर्मय फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र वडनेरे,  मुसधर काजी, सेंन गुप्ता,

गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भारत वेंदे, श्रीमती उमा पाटील, गटशिक्षण अधिकारी प्रतिभा बर्डे, केंद्रप्रमुख राजाराम जाधव, सरपंच मंगा खडके, उपसरपंच भाऊ भुरबुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भुरबुडे, ग्रामसेवक सुरवाडे,

मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, नामदेव धादवड, भाग्यश्री जोशी, प्रशांत बांबळे, योगेश गवारी, सायली भांगरे, शाम आदमने, शिवाजी फटांगरे, सर्वेश लोहार, भोरु सावंत तसेच शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. भाग्यश्री जोशी यांनी सुत्रसंचालन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!