Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मातीमोल दरात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; नाशिकसाठी १९९ कोटी मंजूर

Share

मुंबई | प्रतिनिधी

दिनांक १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान बाजारातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणी पोटी कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एकूण रुपये ३८७ कोटी अनुदान मंजूर केले आहे.  त्यापैकी नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांना १९९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

यासंदर्भात भुसे यांनी ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन मंत्री राम शिंदे यांच्याकडे विनंती केली होती. त्या अनुषंगाने हंगाम २०१८-१९ मध्ये राज्यात माहे ऑक्टोबर २०१८ नंतर बाजारातील कांद्याच्या दरात घसरण झाल्याने दिनांक १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समित्यां मध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये २००/- प्रति क्विंटल अनुदान व २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर कांदा अनुदानाच्या कालावधीत वेळोवेळी वाढ करण्यात आली. सुधारित कालावधी दिनांक १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ असा निश्चित करण्यात आला होता.

दिनांक १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील रुपये ११४.८० कोटी निधी आकस्मिकता निधीद्वारे सदर कांदा अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

आतापर्यंत रुपये १११.८१ कोटी इतके कांदा अनुदान वितरित करण्यात आले असून दिनांक १६.१२.२०१८ ते २८.२.२०१९ कालावधीतील कांदा अनुदान वितरित करण्यासाठी रुपये ३८७ कोटी इतका निधी शासनाने मंजूर केला आहे.

मंजूर रुपये ३८७ कोटी निधी पैकी रुपये १९९ कोटी निधी हा नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांकरिता असून तो या आठवडयात वितरित केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!