शेतकरी संप यशस्वी करण्याचा गिरणारेच्या शेतकऱ्यांचा निर्धार

0

नाशिक प्रतिनिधी ता. २४: येत्या 1 जून ते 10 जून दरम्यान होणाऱ्या शेतकरी संपात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होवून शेतकरी संप यशस्वी करण्याचा एकमुखी निर्णय गिरणारे (ता नाशिक)येथे झालेल्या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी केला.

घरावर काळे झेंडे लावून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला.

नाशिक तालुका शेतकरी संप संयोजन समितीच्या वतीने येत्या 1 जून ते 10 जून 2017 रोजी होणाऱ्या “शेतकरी संप”यशस्वी करण्यासाठी गिरणारे येथील गणपती मंदिरात शेतकरी सभा घेण्यात आली.

यावेळी लग्न कार्यातील, हळद कार्यक्रमातील जेवणावळी, लग्नातील टोपी, फेटे बंदी, साखरपुडे, बस्ते घरगुती व साध्या पद्धतीने करण्याचा ठराव करण्यात आला. शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या अडचणी मांडल्या.

बैठकीत पुंडलिकराव थेटे, निवृत्ती घुले, तालुका संघाचे बाळासाहेब हांडोरे, शिवसेना नेते परसराम गायकर, भिकाभाऊ थेटे, लुखाभाऊ थेटे, काशीनाथ थेटे, विजय थेटे, बाळासाहेब कसबे, दगू नाना थेटे, अक्षय कातड, नितिन गायकर, ज्ञानेश्वर वाघ, शेतकरी वाचवा अभियानचे निमंत्रक राम खुर्दळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*