केडिट गॅरंटी फंड स्कीममुळे एज्युकेशन लोन घेणारे विद्यार्थी वाढले

0

नाशिक , दि, 19, प्रतिनिधी  – मनासारखे उच्चशिक्षण घेण्यासाठी एज्युकेशन लोन घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दरवर्षी वाढत आहे. परंतु त्यातही आता मागील वर्षापासून या लोनवर के्रडिट गॅरंटी फंड स्कीम लागू केल्यामुळे एज्युकेशन लोन घेणारया विद्यार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

सध्या सर्वच राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांकडून एज्युकेशन लोन दिले जाते. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 10.25 ते 10.75 इतक्या व्याजदराने लोन दिले जाते तर खासगी बँकांमधूनही 11 ते 14 टक्के दराने लोन देण्यात येते. यात 7.5 लाखापर्यंतच्या लोनला बँक विनातारण कर्ज देते. परंतु 7.5 लाखापासून पुढील लोनसाठी पालकांंच्या व्यवसायाचा दाखला अथवा टॅक्स रिटर्न घेतले जातात. त्यांच्याकडून लोन फेडण्याची हमी घेतली जाते.

लोन देण्याचे अधिकार सर्वच बँकाच्या व्यवस्थापकांना प्रदान केलेले असतात. त्यांना प्रदान केलेल्या शक्तीनुसार ते 1 कोटीरूपयांपर्यंत एज्युकेशन लोन देवू शकतात. सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यास आठ ते दहा दिवसांच्या आत हे लोन विद्यार्थ्यांना मिळू शकते.

त्यासाठी त्यालाा संबंधित संस्थेत प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. त्यातच एसी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी लोन घेतल्यास त्यांना शिक्षणाचा कालावधी अधिक एक वर्ष कर्जावरील व्याज भारत सरकारकडून माफ केले जाते.

शैक्षणिक कर्ज परतफेडीसाठी भारतात शिक्षण घेत असल्यास 10 वर्षे तसेच परदेशात शिक्ष्ण घेत असल्यास 15 वर्ष मुदत देण्यात येते. एज्यूकेशन लोन घेतांना मुलींना व्याजदरात 0.50 टक्के सूट देण्यात येते.

LEAVE A REPLY

*