Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लासलगावला लाल कांदा दाखल; उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात घसरण

Share

लासलगाव । वार्ताहर

येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर मंगळवारी उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल 501 रुपयांची घसरण झाली. बाजारात लाल कांद्याचे आगमन झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे.

यावर्षी परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने व उन्हाळ कांदा संपत आल्याने सोमवारी उन्हाळ कांद्यास सरासरी 5501 रुपयांचा भाव मिळाला होता. तर मंगळवारी लासलगाव बाजार समितीत 3913 क्विंटल कांदा आवक होऊन व्यापारीवर्गाने 2300 रुपयांपासून 5300 रुपये भावाने कांदा खरेदी केला. कांद्याला सरासरी 4500 रुपयांचा दर मिळाला.

म्हणजेच अवघ्या एका दिवसात कांदा भावात 500 रुपयांनी घसरण झाली. मंगळवारी बाजार आवारात लाल कांदा दहा वाहनांतून विक्रीस आला होता. लाल कांद्याची आवक 116 क्विंटल होऊन या कांद्याला कमीत कमी 2241 रुपये, जास्तीत जास्त 3811 रुपये तर सरासरी 3101 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बाजारात लाल कांदा दाखल होऊ लागल्याने उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण होताना दिसत आहे. पिंपळगाव, उमराणा बाजार समितीतदेखील लाल कांदा दाखल झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!