Video : नाशिक पोलीस आयुक्तांची कन्या रविजा बनली आशियातील यंगेस्ट ‘आयर्नगर्ल’

0
नाशिक | नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी खडतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांची मुलगी रविजानेही आज ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, रविजाच्या आजच्या कामगिरीमुळे ती आशियातील ‘यंगेस्ट आयर्नगर्ल’ बनली असून तिने १६ तास पाच मिनिट आणि तीस सेकंदात तिने ही स्पर्धा पूर्ण केली.

रविजा राष्ट्रीय स्तरावरची स्विमर आहे. तिने याच वर्षी फेब्रुवारीत दिल्लीत पार पडलेली हाफ आयर्नगर्ल स्पर्धादेखील जिंकली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रविजाने वयाच्या १९ व्या वर्षीच हा किताब आपल्या नावे केला. ४ किमी स्विमिंग, १८०.८ किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

रविजा गेल्या दोन वर्षांपासून नाशकातील डॉ पिंपरीकर यांच्या जिममध्ये सराव करत होती. तिला मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ताहेर काचवाला हे तिचे ट्रेनर होते.

रविजा आठवड्यातील सहा दिवस नियमित सराव करत असे. यामध्ये तीन ते चार दिवस जिम आणि दोन ते तीन दिवस ती रस्त्यावर वर्कऑऊट करत होती.

रविजाने केलेल्या कष्टाचे फळ मिळाले

रविजाने खूप मेहनत घेतली. प्रचंड जिद्द आणि वडिलांचा आदर्श यामुळे तिला आयर्न गर्ल होण्यापासून कोणीही रोखू शकले नाही. घरातूनच प्रेरणा असल्यामुळे ती नेहमी या स्पर्धेकडे सकारात्मकतेने बघत होती. अखेर तिला तिच्या कष्टाचे फळ मिळाले.

ताहेर काचवाला, ट्रेनर 

LEAVE A REPLY

*