Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

रश्मी ठाकरेंकडून खा. हेमंत गोडसेंचे औंक्षण

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक लोकसभा मतदार संघात तब्बल ४८ वर्षांनंतर सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास घडवत खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला. विजयानंतर शुक्रवारी मातोश्री गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी खा. गोडसे यांचे औंक्षण केले.

यावेळी शिवसेनेचे निवडून आलेले १८ खासदारही उपस्थित होते. त्यांचेदेखील याप्रसंगी रश्मी ठाकरे यांनी औंक्षण करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मातोश्रीवरचे फोटो सर्वत्र पसरल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेबाबत मत व्यक्त करत शिवसेनेचे वेगळेपण अधोरेखित केले. यावेळी काहींनी म्हटले की, शिवसेना असा एकमेव पक्ष आहे, की ज्या पक्षात निवडून आलेल्या उमेदवारांना असा सन्मान मिळतो.

शिवसेना नुसता पक्ष नसून तुमचे-आमचे दुसरे घर असल्याची भावना कार्यकर्त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!