Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकात युवतीवर अत्याचार; शहरात खळबळ

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलजवळ युवतीवर गेल्या पाच महिन्यांपासून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडीतेने काल मध्यरात्रीच्या सुमारास तक्रार दाखल केली.

शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशातच एका २२ वर्षीय युवतीवर अत्याचार  झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी तिघा नराधमांना अटक करण्यात आली आहे.

इरफान उर्फ राजू, निवृत्ती सोनवणे व हेमंत (पूर्ण नाव माहिती नाही) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितामध्ये एकजन वयोवृद्ध असल्याचे समजते.

पीडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार इरफान याच्याशी पीडीतेची ओळख होती. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केले. यानंतर निवृत्ती आणि हेमंत या दोघांनी इरफान यास याकामी मदत केली. तसेच तिला वेळोवेळी धमकावले.

अखेर या पीडीतेने गुरुवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा सामुहिक अत्याचाराचा प्रकार असल्याचे चर्चा असून अधिक तपासात हे निष्पन्न होण्याची शक्यात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!