Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये जलधारा कोसळल्या; ढगाळ वातावरणामुळे दिवाळी खरेदीवर विरजण

Share

नाशिक | प्रतिनिधी 

हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर आज नाशिकसह जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला. सकाळी त्र्यंबकेश्वर इगतपुरी तसेच नाशिक शहरातदेखील पावसाच्या सरी कोसळल्याने दिवाळीच्या खरेदीवर विरजण पडले. ऐन दिवाळीत विधानसभेचे मतदान होणार असल्याने मतदानावरदेखील पावसाचे सावट आहे. खरिपाची कापणी बऱ्याच ठिकाणी सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनते लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या इतर भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही  भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या भागात तापमान सकाळपासून उकाडा जाणवत होता. दुपारी बाराच्या सुमारास अचानक जलधारा कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती. इगतपुरीमध्येही पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे तालुक्याच्या ठिकाणी दिवाळी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

नाशिक शहरातही रविवार कारंजा, मेनरोड, पंचवटी, शालीमार परिसरात पावसाच्या जलधारा कोसळल्याने दिवाळी खरेदीवर विरजण पडले. थोड्याच वेळात पावसाने उघडीप दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली.

पढुील चार दिवस हवामानाचा अंदाज 

१८ ऑक्टोबर: कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
१९ ऑक्टोबर: कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
२० ऑक्टोबर: कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता
२१ ऑक्टोबर: कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता
२२ ऑक्टोबर: कोकण – गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!