Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पुणे विद्यापीठाकडून शिक्षक, प्राचार्य पुरस्कार जाहीर; 10 फेब्रुवारी रोजी वितरण

Share

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य आणि शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये बारा जणांचा समावेश असून विद्यापीठाच्या वर्धापनदिनी (दि. 10) फेब्रुवारी रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यापीठाने जाहीर केलेले पुरस्कार व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांसह शहरी व ग्रामीण महाविद्यालयांमध्ये विभागून दिले जातात. त्यानुसार शहरी विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार पुण्यातील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचा पुरस्कार नाशिकमधील एच. पी. टी. आर्टस आणि आर. वाय. के. सायन्स महाविद्यालयाला जाहीर झाला आहे.

ग्रामीण भागातील पुरस्कार अनुक्रमे नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी आणि संगमनेर येथील संगमनेर नगरपालिका कला, डी. जे. मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालयाने पटकाविला आहे.

अन्य पुरस्कार पुढीलप्रमाणे 

  • उत्कृष्ट प्राचार्य (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. नीरज व्यवहारे (डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे)
  • ग्रामीण विभाग : डॉ. रवींद्र खराडकर (जी. एस. रासयोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वाघोरी, पुणे)
  • उत्कृष्ट प्राचार्य (अव्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. नितीन घोरपडे (बुबारावजी घोलप कॉलेज, सांगवी, पुणे)
  • ग्रामीण विभाग : डॉ. कुंडलिक शिंदे (आर. बी. नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर, जि. अहमदनगर)
  • उत्कृष्ट शिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. दीप्ती पाटील (कमिन्स कॉलेज ऑ फ इंजिनिअरिंग फॉर गर्ल्स, कर्वेनगर, पुणे) आणि डॉ. मंगेश भालेकर (ए. आय. एस. एस. एम. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
  • ग्रामीण विभाग : डॉ. माधुरी जावळे (संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगाव, जि. अहमदनगर)
  • उत्कृष्ट शिक्षक (अव्यावसायिक अभ्यासक्रम) शहरी विभाग : डॉ. विवेक बोबडे (एच. पी. टी. कला व आर. वाय. के. विज्ञान महाविद्यालय, नाशिक)
  • ग्रामीण विभाग : डॉ. अरूण गायकवाड (संगमनेर नगरपालिका कला, डी. जे. मालपाणी वाणिज्य आणि बी. एन. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर, जि. अहमदनगर)
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!