प्रांत अधिकाऱ्यांनी विचारपूस करताच तलाठ्याला अश्रू अनावर

0
चांदवड (हर्षल गांगुर्डे) | देवळा तालुक्यात तलाठी पुरकर यांच्यावर वाळू माफियांनी काल भ्याड हल्ला करत गंभीर जखमी केले होते. पुरकर सध्या नाशकातील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. आज प्रांतअधिकारी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी दवाखान्यात गेले होते. त्यांना बघतच पुरकर यांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून सदर घटनेतील आरोपीना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी आज नाशिक येथे जाऊन जखमी तलाठी पुरकर यांची भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. याशिवाय दोषींना या प्रकरणात शासन होईल यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचीही माहिती प्रांत अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*