पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी उद्या मुख्य वनसंरक्षकांना घेराव

0

नाशिक | प्रतिनिधी

नेचर क्लब ऑफ नाशिक तर्फे महाराष्ट्रातील भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी उद्या (दि.१२) रोजी नाशिकच्या मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालण्यात येणार आहे.

उद्या सकाळी दहा वाजता मुख्य वनसंरक्षक कार्यालयाचे प्रवेशद्वार असलेल्या अरण्य संकुल त्र्यंबक नाका, आदिवासी विकास भवन समोर एकदिवसीय उपोषण करण्यात येणार होते परंतु उपोषणासाठी परवानगी न दिल्यामुळे नाशिक मधील सर्व पक्षिमित्र, प्राणीमित्र, सर्पमित्र, वृक्षमित्र, पर्यावरणावर कार्य करणाऱ्या संस्था एकत्रित येवून कोणतीही घोषणाबाजी न करता शांतेतेच्या मार्गाने नाशिकच्या मुख्य वनसंरक्षकाना  घेराव घालण्यात येणार आहे.

यावेळी मृत पक्ष्यांसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मागणी करून निवेदन देण्यात येणार आहे.

या दिवशी अभयारण्यातील ग्रामपरिस्थितीकी विकास समितीने देखील पाठींबा दिला असून त्या दिवशी अभयारण्याचे कामकाज न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उपोषण पक्ष्यांच्या संवर्धनासाठी असून नाशिकरांनी  सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा यांनी केले आहे.

या आहेत मागण्या

मोठ्या प्रमाणात सुरु असलेली मासेमारी थांबविण्यासाठी

अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतर करण्यासाठी

जखमी पक्ष्यांना अभयारण्यात उपचार मिळण्यासाठी

वन अधिकाऱ्यांना राजकारणी मंडळीचा येणारा दबाव

पक्षी संरक्षण समिती स्थापन होण्यासाठी

गाईड काम करणाऱ्या मुलांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी

पर्यटकांना विविध सुविधा मिळण्यासाठी

LEAVE A REPLY

*