Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्य मध्ये फुलले भाजपचे कमळ; प्रा. फरांदे विजयी; डॉ.पाटील, भोसले पराभूत

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्य मध्ये भाजपचे कमळ फुलले असून भाजपच्या प्रा.देवयानी फरांदे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या डॉ.हेमलता पाटील यांंचा पराभव केला. प्रा.फरांदे यांना 73 हजार 460 मते मिळाली. तर, डॉ.पाटील यांना 45 हजार 62 इतकी मते पडली. तर, मनसेचे इंजिन तिसर्‍या स्थानी घसरले. नाशिक मध्य मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा निवडून येण्याचा विक्रम प्रा.फरांदे यांनी केला. या अगोदर सलग दुसर्‍यांदा निवडून येण्याची किमया भाजपचे माजी मंत्री स्व.डॉ.डी.एस. आहेर यांनी केली होती.

नाशिक मध्य मतदारसंघात दहा उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही तिन उमेदवारांमध्ये ंहोती. प्रा.फरांदे यांच्यासमोर डॉ.पाटील व भोसले यांनी आव्हान उभे केले होते. त्यात नाशिकक सलग दुसर्‍यांदा कोणाला निवडून देत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाकरी फिरणार का, याबाबत उत्सुकता होती. दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

पोस्टल मतफेरी पासून प्रा.फरांदे यांनी आघाडी घेतली. तर, डॉ.पाटील दुसर्‍या स्थानी व भोसले हे तिसर्‍या स्थानी होती. या तिघांमध्येच शेवटपर्यंत लढत पहायला मिळाली. पहिल्या फेरीपासून प्रा.फरांदे यानीं घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. मतमोजणीच्या एकूण 22 फेर्‍या पार पडल्या. दहा फेर्‍यापर्यंत प्रा.फरांदे यानीं दहा हजार मतांचे मताधिक्य घेतले होते.

शेवटपर्यंत हे मताधिक्य कायम राहिले. शेवटच्या फेरीनंतर प्रा.फरांदे यांनी 28 हजार 398 इतके मताधिक्य घेत विजय मिळवला. मात्र, सन 2014 च्या निवडणुकीचा विचार करता प्रा.फरांदे यांचे मताधिक्य घटल्याचे पहायला मिळाले.


उमेदवारांना पडलेली मते

प्रा.देवयानी फरांदे (भाजप) – 73 हजार 460
डॉ.हेमलता पाटील (काँग्रेस) – 45 हजार 62
नितीन भोसले (मनसे) – 22 हजार 140


जनतेने माझ्यावर विश्वास दाखवत मला प्रचंड बहुमताने विजयी केले. हा भाजप कार्यकर्त्यांचा विजय आहे. पुढील काळात मतदारसंघात अधिक जोमाने काम करुन विकास करेल.

– प्रा.देवयानी फरांदे, आमदार. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!