Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

स्थायी समिती सदस्य निवडीवरून भाजपत बंडाळी; नगरसेविका प्रियांका घाटे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

Share

नाशिक | प्रतिनिधी

स्थायी समिती सदस्य निवड पार महापालिकेत पार पडली. या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून नगरसेविका प्रियांका घाटे यांना स्थायी समितीचे सदस्यत्व न मिळाल्याने नाराजी दाखवत नगरसेविका पदाचा राजीनामा दिला आहे.

यावेळी घाटे समर्थकांनी महापालिकेत प्रचंड गोंधळ केला. गेल्या तीन वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम केले आहे. एकही पक्षाचे पद मला मिळाले नाही.

२०१७ मध्ये महिला बालकल्याणमध्ये त्यानंतर पुन्हा २०२० मध्ये तेच पद दिले. आम्हाला स्थायी समितीचे सदस्यत्व मला मिळायला हवे होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महापौर यांच्याकडे स्थायी समितीचे सदस्यत्व मिळावे यासाठी प्रयत्न केले.

परंतु जाणून बुजून डावलण्यात आल्याने आज नगरसेविका पदाचा मी राजीनामा देत असल्याचे नगरसेविका प्रियांका घाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!