सरकारच्या मर्जीनं होतेय शेतकऱ्यांची लूट

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

0

नाशिक, ता. १२ (प्रतिनिधी) :  शेतकरी अडचणीत आहे, मात्र राज्यातील भाजपा आघाडी सरकारचं शेतकऱ्यांना नाही, तर व्यापाऱ्यांना अभय असून सरकारच्या मर्जीने शेतकऱ्यांची लूट होत आहे. हे दलालांचे सरकार आहे, अशी बोचरी टिका भारिपा बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार हे गाजर असून एकाचाही मंत्रीमंडळात सहभाग होणार नाही असेही त्यांनी मत मांडले.‍

भाजपासोबतच त्यांनी काँग्रेसवरही टिकास्त्र सोडले. काँग्रेस जातीयवादी पक्ष असून शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने काहीही केले नाही. काँग्रेसला राज्यातील परिस्थितीचा फायदा घेता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

#मी टू मुळे महिला बोलायला लागल्या

सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या मी टू या मोहिमेमुळे महिला बोलायला लागल्या ही चांगली गोष्ट असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. पुरुषप्रधान संस्कृतीला धक्के देत ज्या महिला त्यांच्यावरील अत्याचाराबद्दल बोलत आहेत, ते स्वागतार्हच आहे. कायदा महिलांच्या बाजूचा आहे. मात्र काही महिला कायद्याचा दुरूपयोग करतात. नाहक कुणाच्या बदनामीसाठी महिलांनी कायद्याचा वापर करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

*