Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पहिल्याच पावसात नाशिकची बत्ती गुल; महावितरणवर संताप

Share

नाशिक | प्रतिनिधी 

पावसाच्या जोरामुळे शहर व उपनगरीय परिसरातील बत्ती गूल झाली होती. निम्मे शहर गेल्या तीन तासांपासून अंधारात आहे.  काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरु असून अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महावितरणवर राग काढला. पहिल्याच पावसात महावितरणचे नियोजन कोलमडल्यामुळे महावितरणवर पहिल्याच पावसात अनेकांनी ‘खेड्यात राहिलो असतो ते परवडले असते असे म्हणत’ महावितरणवर शरसंधान साधले.

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने आज नाशिक शहरात हजेरी लावली. अचानक बरसलेल्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नेहमीप्रमाणे गेल्या दोन ते तीन तासांपासून शहरात विजेची बत्ती गुल झाली आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

एमजीरोड, सीबीएस, नवीन नाशिक परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. खुटवड नगर परिसरातील शिवशक्ती नगर येथे वाहनावर झाड उन्मळून पडल्याने वाहनाचे नुकसान झाले.

मुख्य शहरासह सिडको, सातपूर, पंचवटी आदींसह उपनगरीय परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर, काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या तुटून रस्त्यालगत खच पडला.

पावसामुळे उष्णता कमी होऊन वातावरणात गारवा पसरला होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, पावसाने दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते, टपरीधारक यांची त्रेधातिरपिट उडाली.

वाहनचालक, पादचारी यांची आडोसा घेण्यासाठी धावपळ उडाली. शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा उडाला होता. काही वाहनचालकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. तासभर धुवाँधार झालेल्या पावसाने रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत होते, तर अनेक ठिकाणी पाणी साचून होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!