Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पित्याकडूनच पोटच्या मुलीचा विनयभंग; पोस्कोचा गुन्हा दाखल

Share

नाशिक | प्रतिनिधी

जन्मदात्या पित्यानेच १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईनेच म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार फिर्यादी या पिडीत मुलीसह घरात झोपलेल्या असताना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुलीचे तोंड दाबून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबत विचारणा करताच संशयिताने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर भेदरलेल्या आई आणि पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित पित्याविरोधात बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!