Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पोलिसाने दंडुका मारलेल्या युवकाची प्रकृती गंभीर; पोलीस आयुक्त नांगरे पाटलांनी लक्ष घालण्याची मागणी

Share

नाशिकरोड | प्रतिनिधी

सिन्नर फाटा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास हेल्मेट तपासणी मोहीम सुरू असताना दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाच्या डोक्यात पोलिसांनी काठी मारली होती.

या घटनेत जखमी झालेल्या शुभम महाले औषधोपचारासाठी आडगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.

एवढही भयानक घटना पोलिसांकडून घडूनही पोलीस अधिकारी वा कर्मचारी अद्याप रुग्णालयात जखमी युवकाची विचारपूस करायला गेला नाही. यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

तसेच पोलिसांवर वरिष्ठांनी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे शुभम महाले याची परिवार व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत लक्ष घालावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

 

युवकाच्या डोक्यात पोलिसाने घातला दंडुका; युवक आयसीयूत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!