पिंपळगाव बसवंत : कांंदाषष्ठीची चंपाषष्ठी झाली अन् मोदी ट्रोल होता होता वाचले

0

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा पिकतो. येथे कांदा उत्पादक शेतकर्‍यांची संख्या जास्त आहे आणि कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत, याची माहिती समजल्यावर कांदाप्रश्न भाषणात हाताळण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला.

ते पिंपळगाव बसवंत येथील सभेत संबोधित करत होते. कांद्याबाबत त्यांना फारशी माहिती नसल्याने पालकमंत्री, उमेदवार, आमदार मार्गे महापौर अशी विचारपूस त्यांनी केली. कांद्याची माहिती देणार्‍यांना ‘कांदाषष्ठी’ की ‘चंपाषष्ठी’? ते न उमगल्याने काही वेळ सर्वांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली.

अखेर महिला उमेदवाराने ‘कांदाषष्ठी नव्हे चंपाषष्ठी’ असे पंतप्रधानांना अवगत करून देत संभाव्य अनर्थ टाळला. आजच्या सभेत पंतप्रधान कांदा प्रश्नावर बोलतात की नाही? असा प्रश्न उपस्थित करून सभेत कांदाप्रश्नी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा चंग बांधला होता.

कांदाप्रश्नी न बोलल्यास त्याचा जाब पंतप्रधानांना सभास्थळी विचारण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, याची कुणकुण महायुतीच्या नेत्यांना लागताच त्यांनी पंतप्रधान मोदी यांना त्याबाबत सावध केले होते. त्यानंतर कांदा कोणत्या सणाच्या दिवशी अधिक खाल्ला जातो याची विचारणा पंतप्रधानांनी पालकमंत्र्यामार्फत महिला उमेदवाराकडे केली.

अखेर नाशिकच्या प्रथम नागरिकांनी जराही वेळ न दवडता चंपाषष्ठीला कांदा खाण्यास सुरुवात होते, असे उत्तर दिले. कांदाषष्ठी नव्हे तर चंपाषष्ठीला कांदा अधिक खाल्ला जातो अशी दुरूस्ती करून दिली.

तर मोदी झाले असते ट्रोल 

जर मोदींनी चंपाषष्ठीला कांदाषष्ठी म्हटले असते तर सर्वात प्रभावी समजल्या जाणाऱ्या सोशल मीडियात मोदी ट्रोल झाले असते. विरोधकांनादेखील टीकेसाठी नवा मुद्दा उपस्थित झाला असता, मात्र असे झाले नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

*