Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

दुकानातून स्वीट्स खरेदी करण्याआधी जाणून घ्या; प्रत्येक पाकिटावर एक्सपायरी डेट बंधनकारक

Share
confectionery

नाशिक | प्रतिनिधी 

मिठाई विक्रेत्यांना यापुढे उत्पादन आणि तारीख नमूद करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ ठराविक कालावधीनंतर खराब होतात. यामुळे बऱ्याचदा विषबाधेसारखे प्रकार उद्भवतात. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाकडून लवकरच यावर धोरण आखले जाणार आहे.

विविधतेने नटलेल्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सण उत्सव साजरी केले जातात. यामुळे सण उत्सव काळात मिठाईला मोठी मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई दुध व दुग्धजन्य पदार्थापासून बनवल्या जातात.

त्यामुळे या मिठाईचे आयुष्य मर्यादित असते. मुदतबाह्य मिठाईच्या सेवनामुळे विषबाधेसारखे प्रसंग अनेकदा उदभवतात. पॅकबंद मिठाई आणि इतर अन्नपदार्थांच्या पाकिटावर यापुढे उत्पादन दिनांक व सर्वोत्तम दिनांक (बेस्ट बिफोर) नमूद करणे अन्न सुरक्षा व माणदे ( पॅकेजिंग व लेबलिंग) नियमावली 2011 नुसार बंधनकारक करण्यात आले आहे.

आता दि 24 फेब्रुवारी 2020 रोजी भारतीय अन्न सुरक्षा व माणदे प्राधिकरण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार दुकानात विक्रीसाठी असलेल्या सुट्या मिठाईच्या ट्रे वरही मिठाईचा उत्पादन दिनांक तसेच सर्वोत्तम दिनांक नमूद करणे बंधन कारक करण्यात आले आहे.

उत्पादनाचा प्रकार व स्थानिक परिस्थिती यांचा विचार करून सर्वोत्तम दिनांक निश्चित करावयाचा आहे. यासाठी आवश्यक मार्गदर्शक माहिती भारतीय अन्न सुरक्षा व माणदे प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पुरवण्यात आली आहे.

1 जून 2020 पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नाशिक विभागात या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!