Tuesday, April 23, 2024
Homeनाशिक‘ती’ व्हायरल छायाचित्रे सप्तशृंगी गडावरील नाहीत; भाविकांनी घाबरून जाऊ नये

‘ती’ व्हायरल छायाचित्रे सप्तशृंगी गडावरील नाहीत; भाविकांनी घाबरून जाऊ नये

सप्तशृंगीगड | वार्ताहर

गेल्या दोन दिवसांपासून फेक फोटो गडावरील घाटातील अपघाताचे फोटो या आशयाने पसरवले जात आहेत. तरी हे फोटो गडावरील नसून गडावर गेल्या दोन-तीन दिवसांत कुठलाही अपघात झाला नसल्याचा निर्वाळा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियात अज्ञात व्यक्तीने गडाचा उल्लेख करून काही रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यासह परिसरात एकाच खळबळ उडाली होती.

या घटनेच्या छायाचित्रांमुळे असंख्य भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्माण झालेला आहे. मोठ्या संख्येने भाविक वर्गाने या बाबत कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व इतरत्र अपघात बाबतची माहितीची विचारना केलेली आहे.

श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे जाणारा घाट रस्ता सध्यस्थितीत सुरक्षित असून घाटरस्ता दरम्यान कोठेही व कोणत्याही प्रकारच्या वाहन अपघाताची घटना घडलेली नाही.

त्यामुळे भाविक व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व आपल्या दूरध्वनीवर इतरांनी पाठविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचे तपशील अथवा छायाचित्र बाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्या शिवाय ते इतरत्र पाठवू नये.

तसेच कोणत्याही तीर्थ क्षेत्र अथवा ठिकाणा संदर्भात अश्या आशयाच्या माहितीवर संपूर्ण खात्री करणेकामी संबंधित ट्रस्ट कार्यालय, स्थानिक ग्रामपालिका, पोलीस ठाणे अथवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय / तालुका आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी आवश्यक तो समन्वय साधून त्या बाबतची अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी…!

तालुक्यात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्हास्ट्सप ग्रुप वर सप्तशृंगी घाटातील अपघाताचे फोटो व्हायरल झालेले असून ही बातमी खोटी व फेक असल्यामुळे कोणीही विश्वास करू नये तसेच असे काही घडल्यास सप्तशृंगी ट्रस्ट भाविकांपर्यंत सूचना देखील देत असते

सुदर्शन दहातोंडे व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड.

असे खोटे व्हाट्सप्प फोटो सोशल मीडियावर अनेक लोक पाठवतात मात्र त्यामुळे सप्तशृंगीगडावरचा व्यापारी वर्ग मंदीचा सामना करत आहे

प्रकाश कडवे, सप्तशृंगीगड

- Advertisment -

ताज्या बातम्या