Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : पर्यटकांना आकर्षण महाराष्ट्राच्या काश्मीरचे अर्थात इगतपुरीचे…

Share
घोटी | वार्ताहर
महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरीला हिरवाईची शाल पांघरण्यास सुरुवात झाली आहे. येथील अनेक धबधबे हळूहळू वाहू लागले आहेत. राज्यात पावसाचे कोठार, धरणांचा तालुका असलेल्या या तालुक्यात आता पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. गेल्या आठवड्यापासून याठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला हिरवाईची चादर पांघरली असून पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत.
निसर्गाचा खजिना म्हणून समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात सात मोठी  धरणे आहेत. आल्हाददायक निसर्ग, डोंगरांवरची हिरवाई, घाटाच्या बोगदयातून टुमदारपणे धावणारी रेल्वे, तालुक्यात असलेली ऐतिहासिक गड़किल्ले, महामार्गावर धुक्यांची चादर, संततधार बरसणारा पाऊस पर्यटकांना खुणावत असून याठिकाणी मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
शनिवार, रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी तालुक्यात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. भात अवनीला काही भागात प्रारंभ झाला असून पर्यटक येथील छायाचित्रणासाठी गर्दी करत आहेत.
सर्व फोटो प्रशांत निकाळे, देशदूत टाईम्स
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!