Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : नाशिकची ऐतिहासिक वास्तू असलेल्या सरकारवाड्यात ‘ड्रेनेज’चे पाणी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

वेगाने विकास होणाऱ्या शहरात नाशिक गणले जाते. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम या शहरात अनुभवायला मिळतो. येथील ऐतिहासिक वास्तूंची जपवणूक करण्यात येथील प्रशासन मात्र सपशेल अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील ऐतिहासिक सरकारवाड्यात ड्रेनेजचे पाणी शिरल्याने याठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेला कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही अद्याप याठिकाणी साफसफाईसाठी कुणीही फिरकले नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

१९७२ पासून महापालिकेने येथील सरस्वती नाल्याची साफसफाई न केल्याने सरकारवाड्यात ड्रेनेज चॉकअप होऊन सांडपाणी शिरले असल्याचा आरोप इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजचे योगेश कासार पाटील यांनी केला आहे.

प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे जागतिक वारसा आठवड्याच्या उत्सवावरदेखील याचा परिणाम होणार असल्याची माहिती पुरातत्व खात्याकडून देण्यात आली आहे. नाशिकसह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. शेती पाठोपाठ ऐतिहासिक वास्तुंनाही याचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत आहे.

या वास्तूंच्या देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाची असली तरीही ड्रेनेज साफ करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. अवघे आठ कर्मचारी याठिकाणी काम करतात त्यामुळे सरकारवाडयाच्या वास्तूतील ड्रेनेजचा हा परिणाम नसल्याचेही सांगण्यात येत आहे. महापालिकेने पुरातत्व विभागातील अडचणी दूर करून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशीही मागणी केली जात आहे.


 जागतिक वारसा

पेशवाई १८१८ साली खालसा झाली आणि हळूहळू इंग्रजांनी भारतभर आपला साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. याचा एक साक्षीदार म्हणजे आजही नाशिकमध्ये उभा असलेला सरकार वाडा. या वाड्याची भिंत अतिशय गुळगुळीत दगडातून बनवलेली आहे. याच वाड्याला पुलावरचा वाडा असेही काहीजण म्हणतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!