Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पेट्रोलच्या किमतीत ११ पैसे घट; गेल्या पाच दिवसांत पेट्रोल ७० पैसे तर डिझेल ८३ पैशांनी घसरले

Share

नाशिक । प्रतिनिधी

आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटून आले असल्याने इंधन दरवाढीची टांगती तलवार संपूर्ण जगासमोर आहे. असे असताना गेल्या आठवड्यापासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीत घसरण होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मागील पाच दिवसांचा विचार करता नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात ७० पैसे तर डिझेलच्या दरात ८३ पैशांची घसरण झाली.

आज दि.२० नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ११ पैसे व डिझेलच्या किंमतीत २० पैसे घट झाल्याने पेट्रोल ८१.१६ रुपये तर डिझेलची ७१.०२ रुपये प्रतिलिटरने विक्री सुरु होती.

ट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येक दिवशी वाढ किंवा घट होत असते. दररोज सकाळी ६ वाजता देशातील पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे दर निश्चित करण्यात येतात. ऑइल मार्केटिंग कंपनी दररोज पेट्रोल-डिझेलच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचे समिक्षण करून हे दर निश्चित करते.

या किंमती कच्च्या तेलाच्या किंमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. त्यानुसार आज दि.२० नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ७० पैसे आणि ८३ पैसे घसरण बघायला मिळाली. रविवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी १६ पैशांची घट झाली होती.  दि.१५ जानेवारीपासूनच विचार केल्यास इंधन दरात प्रतिदिन सरासरी १५ पैसे घट झाल्याचे चित्र आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ११ पैशानी स्वस्त होऊन ७४.९८ रुपये दराने विक्री करण्यात आले. तर डिझेलच्या किमतीत १९ पैसे घट झाल्याने ६८.२६ पैसे दराने विक्री करण्यात येत होती. तर मुंबईत पेट्रोलचे दर ११ पैसे घटून ८०.५८ पैसे आणि डिझेल २० पैसे स्वस्त झाल्याने ७१.५८ पैसे प्रतिलिटर इतके झाले होते.


गेल्या पाच दिवसांतील दरतक्ता

१५ जानेवारी रोजी ८१.८६ रुपये असणाऱ्या पेट्रोलच्या दरात नाशिकमध्ये १६ जानेवारीला १४ पैसे, १४ जानेवारीला १४ पैसे, १८ जानेवारीला १५ पैसे, १९ जानेवारीला १६ पैसे घत झाली. तर याच कालावधीत डिझेलच्या किमती अनुक्रमे १५ पैसे, १५ पैसे, १७ पैसे, १६ पैशांनी घटल्या होत्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!