Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

निवडणूकीतील गैरप्रकाराच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल; 13 मार्च रोजी सुनावणी

Share
निवडणूकीतील गैरप्रकाराच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल, nashik news Petition filed election misconceptions sinnar breaking news

तहसिलदारांसह सर्वांना समन्स

सिन्नर । प्रतिनिधी

सिन्नर विधानसभा निवडणूकीपूर्वी मुदतीत तक्रार करुनही निवडणूक यंत्रणेने 12 हजार दुबार नावे रद्द न करता मतदार यादीत समाविष्ट केली. त्याशिवाय कोपरगाव तालु्नयातील 8 हजार मतदारांची नावे तालु्नयाच्या विविध गावांमध्ये नोंदवून मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. अल्पवयीन मुलांची नावेही मतदार यादीत नोंदवून त्यांच्याकडून मतदान करुन घेण्याचे गैरप्रकार येथील निवडणूक यंत्रणेने केली आहेत.

यासंदर्भातील पुरावे देत या गैरप्रकारांना जबाबदार असणाऱ्या बी.एल.ओ. पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करावी यासाठी आपण उच्च न्यायालयात दाखल केलेली याचीका न्यायालयाने स्विकारली असून यावर येत्या 13 मार्च रोजी पहिली सुनावणी होणार असल्याची माहिती माजी आमदार राजाभाऊ तथा पराग प्रकाश वाजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणूकीच्या आधीपासूनच अशा पध्दतीने मतदारांची नावे दुसऱ्या गावांमध्ये नोंदवण्याचा प्रकार सुरु झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनीही लोकसभा निवडणूकीच्या वेळी तालु्नयात 22 हजारांवर दुबार नावे घुसवण्यात आल्याची तक्रार केली होती.

मात्र, निवडणूक यंत्रणेने त्याकडे गांभीर्याने पाहीले नाही. विधानसभा निवडणूकीपूर्वी मतदार यादीतील 12 हजार दुबार नावांबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत आपण आक्षेप नोंदवला होता. त्यावर 3500 नावांबाबत पंचनामा होऊन ही नावे दोन ठिकाणी असल्याचे तालु्नयाच्या निवडणूक यंत्रणेने मान्यही केले होते.

मात्र, कुणालाही मतदानापासून वंचीत ठेवता येणार नाही असे म्हणत या दुबार नावांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यात आल्याचा आरोप वाजे यांनी केला. मतदार यादीत अनेक अल्पवयीन मुलांची नावे नोंदवण्यात आली असून त्यांच्या वयाच्या पुराव्यासह बोनाफाईड सर्टिफिकेटही आपण न्यायालयात दाखल केली आहेत.

शेजारच्या कोपरगाव तालु्नयातील 8 हजार मतदारांची नावे मतदार संघातल्या हिवरगाव, सुळेवाडीपासून टेंभूरवाडी या पश्चिमेच्या गावात तर अगदी टाकेद जिल्हा परिषद गटातील शेवटचं टोक असणाऱ्या आंबेवाडीपर्यंतच्या अनेक गावांमध्ये मतदार यादीत घुसवण्यात आली व या सर्वांनी मतदार केल्याचे, कोपरगावसह सिन्नर मतदार संघात असे दोन वेळा मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदान केंद्रातील आमच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केलेल्या खूणांच्या याद्या आमच्याकडे आहेत.

मात्र, त्या न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत. त्यामुळे मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ही माहिती मागून चार महिने झाले तरी ही यंत्रणा माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. न्यायालयासमोर हे सर्व त्यांनाच सादर करावे लागणार असून निवडणूकीतील गैरप्रकार उघड होणार असल्याकडे वाजे यांनी लक्ष वेधले.

दोनदा मतदान करता यावे यासाठी खोटे ओळखपत्र, खोटे आधारकार्डही तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असणारा ओटीपी नंबर बाहेर देऊन मतदार यादीत नावे घुसवण्यात आली आहेत. दोन्ही ठिकाणी एकच नाव व छायाचित्रही तेच असल्याचेही स्पष्ट दिसत असल्याने निवडणूकीत झालेल्या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी याचीका दाखल केली असल्याचे वाजे म्हणाले. यासंदर्भातील न्यायालयाचे समन्स तहसिलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना बजावण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कायदेशीर कारवाईसाठी याचिका

निवडणूक रद्द करुन आपल्याला विजयी घोषीत करावे यासाठी आपण ही याचीका दाखल केलेली नाही. दुबार मतदार, अल्पवयीन मतदाराबाबत आपण पुराव्यानिशी केलेल्या तक्रारींवर कारवाई न करता निवडणूक यंत्रणेने ती नावे मतदार यादीत तशीच ठेवून दुबार मतदानासाठी नकळत त्यांना प्रोत्साहीत केले. कुणाला तरी फायदा व्हावा यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या बी.एल.ओ. पासून निवडणूक निर्णय अधिकारी ते जिल्हाधिकारी यांच्याविरोधात कायदेशिर कारवाई करावी यासाठी आपण ही याचीका दाखल केली आहे.
राजाभाऊ तथा पराग वाजे, माजी आमदार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!