Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पेठ – जळगाव बसला उमराळेनजीक अपघात; ५० पेक्षा अधिक प्रवाशी बचावले

Share

पेठ | प्रतिनिधी

आगाराच्या पेठ -जळगाव बसला उमराळेनजीक अपघात झाला. भरधाव बस अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला एका चारीत फसली. सुदैवाने या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. प्राथमिक उपचार करून या प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.

आधी माहिती अशी की, पेठ आगाराची पेठ -जळगाव ही बस आगारातून सकाळी नऊ वाजता जळगावकडे निघाली. बस क्रमांक एमएच १४ , बीटी ३६२७ क्रमांकाची ही बस तालुक्यातील उमराळे गावानजीक पोहोचली असताना अचानक एक दुचाकीस्वार बसच्या समोर आला.

त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाकडून बसचे नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन फसली. या बसमध्ये ५० पेक्षा अधिक प्रवाशी होते.

बस अचानक रस्त्याच्या कडेला उतरल्यामुळे बेसावध असलेल्या प्रवाशांच्या डोक्याला, हाताला किरकोळ दुखापती झाल्या. अपघातामुळे बसचालक घाबरला असताना स्थानिकांच्या मारहाणीपासून वाचण्यासाठी चालकाने अपघातस्थळापासून पळ काढला.

दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने चालकाचा राग अनावर झाल्यामुळे बसवर दगडफेक केली. दगडफेकीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातील किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचार करून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!